बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

नवी दिल्ली | आय.एच.एस मार्कीट यांनी पुढच्या आठवड्यात एक आंतरराष्ट्रीय उर्जा संमेलनाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘CERAWeek जागतिक उर्जा आणि पर्यावरण नेतृत्व’ या पुस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी महिती आय.एच.एस मार्कीटने दिली आहे.

या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत जॉन केरी, बिल अँड मेलिंडा फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि ब्रेक थ्रू एनर्जीचे संस्थापक बिल गेट्स आणि सौदी अरामकोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन नासिर हे उपस्थित राहणार आहेत.

आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या भूमिकेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दृष्टिकोनाकडे पाहत आहोत. देश आणि जगाच्या आगामी काळातील ऊर्जेबाबत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत होत असलेल्या विकासात भारताच्या नेतृत्वाचा विस्तार करण्याच्या आपल्या बांधिलकीसाठी, आम्हाला त्यांना CERAWeek जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आनंद होत आहे, असं आय.एच.एस मार्कीटचे उपाध्यक्ष आणि कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॅनिअल येर्गिन यांनी सांगितलं.

सार्वत्रिक उर्जा उपलब्धता सुनिश्चित करताना शाश्वत भविष्यासाठी हवामान बदलांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नरेंद्र मोदींचं नेतृत्व महत्त्वपूर्ण आहे, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप

‘माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून…’; कंगणाची हृतिक रोशनवर बोचरी टीका

‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ

खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More