बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरूणा भाटिया यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आहे. अरूणा भाटिया या 77 वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी असल्यानं त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आपल्या आईच्या निधनाने अक्षय सध्या दु:खात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षयच्या दु:खात सहभागी होत सांत्वनपर पत्र लिहिलं आहे.

जर मला तुला हे पत्र लिहावं लागलं नसतं तर किती चांगलं झालं असतं. आई अरूणा भाटिया यांच्या निधनाच्या वार्ता ऐकून खूप दु:ख झालं. जेव्हा सकाळी फोनवर बोललो तेव्हा तु खूप दु:खी होतास. आई तुझ्यासाठी सर्वस्व होती, असं तु लिहिलं होतं. तुझ्या आई तुझ्यामागे खंबीरपणे उभी होती. आता तू स्वत:ला सावर, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला धीर दिला आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहलेलं पत्र त्याच्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केलं आहे. अक्षय पत्र शेअर करताना लिहितो की, आईच्या निधनाबद्दल तुम्ही सर्वांनीं पाठवलेल्या शोक संदेशाबद्दल मी विनम्रपणे सर्वांचा आभारी आहे. तुमचा वेळ काढत माझ्या दिवगंत पालकांबद्दल उबदार भावना प्रकट करण्यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार. आपले हे सांत्वनदायक शब्द माझ्या कायम सोबत राहतील. जय आंबे, असं अक्षयने इंन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

दरम्यान, अक्षयने त्याची आई अरूणा भाटिया यांच्या निधनाची बातमी दिली होती. माझी आई माझा कणा होती, तिच्या जाण्याने मला माझ्या अंतकरणात प्रचंड वेदना होत आहेत. माझ्या आईने जगाचा निरोप घेतला आहे, ती माझ्या वडिलांकडे गेली आहे, असं म्हणत अक्षयने सर्वांच्या प्रार्थनांचा आदर करत ओम शांती असं लिहलं होतं.

पाहा पत्र-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

थोडक्यात बातम्या – 

“…अन्यथा राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”

हसून हसून लोटपोट व्हाल! मुलगी पटत नाही म्हणून तरूणाचं थेट आमदारांना पत्र

पुण्यात मुसळधार पाऊस! खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

‘…म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला’; संजय राठोड यांचा खुलासा

‘…त्यामुळं CM नाही तर PM बदला’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More