बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी शाॅपिंग करा”

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत सतत तिच्या मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर राखी नेहमीच उघडपणे व्यक्त होते. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना राखी सावंतने त्यांच्याकडे मागणी केली आहे.

अमेरिकेत असणाऱ्या नरेंद्र मोदींना राखीने तिच्यासाठी शाॅपिंग करण्यास सांगितलं आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिनं मोदींकडे शाॅपिंगची मागणी केली आहे. या व्हिडीओची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

राखीला प्रश्न केल्यानंतर नरेंद्र मोदी नमस्कार! तुम्ही अमेरिकेला गेला हे ऐकून आनंद झाला असल्याचं राखीने म्हटलं आहे. तेथील सर्व भारतीयांना माझा नमस्कार आणि प्रेम द्या, तेथील भारतीयांवर माझं प्रेम असल्याचं राखीने म्हटलं आहे. तसेच यावेळी येताना माझ्यासाठी शाॅपिंग करुन या, अशी मागणी राखीने केली आहे.

दरम्यान, सध्या ‘बिग बाॅस 15’ची चर्चा प्रचंड रंगली आहे. मात्र या चर्चेला सर्वात जास्त उधाण आलं ते राखी सावंतच्या पतीमुळे. या सीझनमध्ये राखी तिचा पती रितेशसोबत दिसणार असल्याची चर्चा आहे.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

थोडक्यात बातम्या-

अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून उघडणार चित्रपटगृहे

“ठाकरे सरकार टक्केवारीच्या फुगड्या खेळतंय का?”

आम्हाला पुन्हा संधी मिळणार, कधी ते सत्तेत तर… – देवेंद्र फडणवीस

UPSC Result | मराठवाड्याच्या विनायक महामुनीने देशात मिळवला 95 वा क्रमांक

UPSC Result | शेतकरी बापाचे कष्ट फळाला आले; सोलापूरचे शुभम जाधव साहेब झाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More