बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद; वाचा काय म्हणाले मोदी…

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून भारतातील नागरिकांशी ऑनलाइन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दलची विस्तृत माहिती दिली. त्याबरोबरच 23 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

साथीचा रोग देशभरात पसरल्यानंतर पूर्वी इतर देशांमध्ये लसींचा शोध लागायचा आणि त्याचं उत्पादन व्हायचं त्यानंतर बऱ्याच काळानंतर भारताला लसींचा पुरवठा व्हायचा. परंतु, आता पूर्णपणे चित्र बदललेलं असून भारतातच लसींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हायला सुरुवात झाली आहे आणि आपण इतरही देशांना लसींचा पुरवठा करत आहोत, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवलं. त्याबरोबरच परदेशी कंपन्यांबरोबर करार केले असून परदेशी लसी भारतात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

पंतप्रधान मोदींनी साधलेल्या संवादामध्ये मुख्यतः त्यांनी लसीकरण या मुद्द्यावरच भाष्य केलं. त्याबरोबरच देशातील एकूणच परिस्थिती आटोक्यात आल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. देशामध्ये मागच्यावर्षीच लसीकरणासाठी टास्क फोर्स बनवली होती हे देखिल त्यांनी सांगितलं.

पुढच्या दोन आठवड्यामध्ये 18 वर्षांच्यावरील नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी देशातील सर्व राज्यांना 100% लसी केंद्र सरकार मोफत पुरवेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे. देशात उत्पादन होणाऱ्या लसींच्या एकूण साठ्यापैकी 25 टक्के साठा खाजगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहे. तसेच निर्धारित किमतीपेक्षा फक्त 150 रुपये खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

भूतकाळात भारताचं लसीकरण संथगतीने चालायचं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या 4 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मोस्ट डिझायरेबल वुमन 2020 यादीत रिया टाॅपला, द टाईम्सने केली यादी जाहीर

“अजितदादासोबत बांधावरची लढाई नाही, पण मी पक्षाबद्दल आणि मोदींबद्दल काहीच ऐकून घेणार नाही”

#कोरोना! घरी वाफ घेत असाल तर थांबा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More