Top News देश

‘कमलनाथ सरकार पाडण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची भूमिका’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली | कमलनाथ सरकार पाडण्यामागे महत्वाची भूमिका कोणाची होती तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची, असा गौप्यस्फोट भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. इंदूरमधील शेतकरी संमेलनात ते बोलत होते.

मी तुम्हाला पडद्यामागची गोष्ट सांगतो, आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही मात्र या व्यासपीठावर सांगतो. कमलनाथ यांचे सरकार खाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती तर नरेंद्र मोदींनी, धर्मेंद्र प्रधान यांनी नाही, असं विजयवर्गीय यांनी सांगितलं.

कमलनाथ जोपर्यंत सरकारमध्ये होते तोपर्यंत एक दिवस त्यांना शांत झोपून दिलं नाही असा एक भाजपचा कार्यकर्ता होता तो कमलनाथ यांना स्वप्नातसुद्धा दिसायचा ते म्हणजे नरोत्तम मिश्रा असल्याचं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आता मला सगळेजण म्हणतात तु आयुष्यात काहीतरी करून दाखवलंस- राखी सावंत

धक्कादायक! ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या