बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या नेत्यासोबतची मैत्री आणि विश्वासच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय’; काॅंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींकडून कौतुक!

नवी दिल्ली |  गेल्या काही दिवसांपासून पंजाब काॅंग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर लगेचच छत्तीसगडमधील 11 काॅंग्रेसच्या  आमदारांनी दिल्लीत कुच केली. त्यामुळे  देशात अनेक राजकीय तर्क वितर्क लावले गेले. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काॅंग्रेसच्या एका मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विकासकामांची यादीच माझ्यापुढे ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असुनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी अशोक गेहलोत यांचे मी आभार मानतो. ते माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी अशोक गेहलोत यांचं कौतुक केलं.

कोरोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरचं काही शिकवलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश आपापल्या परिने या संकंटाचा सामना करत आहे. या काळात भारताने आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे, असंही नरेद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, केंद्र सरकारने राजस्थानमध्ये 23 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यापैकी 7 महाविद्यालयांचं काम चालू झालं आहे. जयपूरमध्ये पेट्रोकेमिकल्स संस्थेचं उद्धाघाटन होणं ही महत्वाची पावलं आहेत, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

”नाना पटोले काहीही बोलतात, नाना असे व्यक्ती आहेत जे…”

“मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो, त्यावेळी पंकजा मुंडे अमेरिकेत…”

एअर इंडियाच्या बोलीवर टाटा समुहाची मोहर; तब्बल 68 वर्षानंतर पुन्हा मिळवली मालकी

‘आईस्क्रीम की इडली ?’, शशी थरूर यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

स्पर्धा परीक्षेचा आणखी एक बळी! अपयशानं विद्यार्थ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More