बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधानांचा हस्तमैथुन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन्…

निकोसिया | पंतप्रधान पदावरील व्यक्ती हा जबाबदार नागरिक असतोे. त्या पदाचा सन्मान राखला जाणं अपेक्षित असतं. पण कधी कधी त्या व्यक्तीला राजकीय बंडाळी, भ्रष्टाचार, अव्यवहार तर कधी अनैतिक कारणावरून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. अशाच एका कारणावरून सध्या सायप्रस देशाचे पंतप्रधान इरसान सानेर यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

एका मुलीशी व्हिडीओ काॅलवर बोलत हस्तमैथून केल्याप्रकरणी इरसान सानेर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सोशल मीडियावर सानेर यांचा सेक्स अॅक्टचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सायप्रस देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. मला बदनाम करण्यासाठी माफियानं हे षडयंत्र रचलं आहे, असं सानेर यांनी आपल्या विरोधकांवर आरोप करत म्हटलं आहे.

सानेर यांच्या या वायरल व्हिडीओनंतर देशात खळबळ माजली आहे. सानेर यांच्या मते, या व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती दुसरीच कोणी आहे. सानेर यांच्यावर आधीच राजीनामा देण्यासाठी दबाव वाढवला जात होता. त्यात आता हे प्रकरण बाहेर आल्यानं सानेर यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

दरम्यान, 54 वर्षीय सानेर यांची गणना सायप्रसच्या ताकतवान राजकारण्यांमध्ये होते. सायप्रस देश जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी 2.4 मिलियन पेक्षा अधिक पर्यटक या देशाला भेट देतात.

थोडक्यात बातम्या 

ठरलं तर! अचानक रद्द झालेला ‘तो’ निर्णायक कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार

‘गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

“…तर मी स्वत: अशोक चव्हाण यांचा जाहीर सत्कार करेन”

कोंबड्यांमुळे नवा व्हायरस पसरण्याची भीती; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

1975 नंतर पावसाचा नवा विक्रम! ‘या’ कारणामुळे थांबला परतीचा पाऊस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More