नवी दिल्ली | पंतप्रधान हा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतो. देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च सुरक्षा नियमांचं पालन केलं जातं. त्यासाठी जगातील अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलं होतं. त्यालाच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असंही म्हणतात. यासाठी यावर्षी बजेटमध्ये तब्बल 600 कोटींची तरतूद करण्यात आलीय.
स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत अभूतपूर्व वाढ झाली आहे.
दरम्यान, मागच्या वर्षी 540 कोटींची तरतूद करण्यात आली. पंतप्रधानांचे देशविदेशातील दौरे, त्यांचं निवासस्थान, त्यांचं कुटुंबीय या सगळ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीचं संरक्षण कव्हर दिलं जातं.
ट्रेंडिंग बातम्या-
“शून्याचा शोध आर्यभट्टने लावला अन् लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावावर”
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अखेरचा तोडगा नाही- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारने मांडलेल्या बजेटवर पी. चिदंबरम यांची सडकून टीका
CAAला पाठिंबा पण NRC राज्यात लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्हच- चित्रा वाघ
Comments are closed.