बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र

मुंबई | कोरोनाचं संकट असतानाच केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणं आवश्यक आहे, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. प्रीतम मुंडे यांनी या संदर्भात मोदी तसेच केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे.

केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा पुढच्या आठवड्यापासून राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौड यांना पत्र लिहून खतांच्या दरवाढीवर त्यांचं लक्ष वेधलं आहे. 1200 रुपयाचं खत 1900 रुपयांना मिळणार आहे. ही आर्थिक लूट आहे. यातून भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसल्याचं दिसून आलं आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केलीये.

थोडक्यात बातम्या- 

“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

कोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ

‘दोन हजार दे तुझी गाडी सोडतो’; पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More