पुणे महाराष्ट्र

…’या’ गोष्टीमुळं शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज

पुणे | कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामती हॉस्टेल येथून सहभागी झाले. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीचं संकट आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ एकदाच सर्वपक्षीय बैठक घेतली आहे. त्यावर नाराजी व्यक्त करताना अशा अनेक बैठका आतापर्यंत व्हायला हव्या होत्या, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय.

कोरोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. त्यावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे अद्यापही नोटिफिकेशन आलेले नाहीत. त्यामुळे या पॅकेजच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. बँकांना हा अध्यादेश येत नाही तोपर्यंत कर्ज पुनर्गठन प्रक्रिया सुरू करण्यास बँका तयार होणार नाहीत, असं शरद पवार यांनी नमूद केलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘हा’ भाग नवा कंटेन्मेंट परिसर घोषित; एकाच दिवशी सापडले 19 कोरोनाबाधित रुग्ण

आम्हाला डोमकावळे म्हणताय, जनता तुम्हाला लबाड लांडगे म्हणते; शेलारांची टीका

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाशी लढा देण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतंय का?, आजची आकडेवारी धक्कादायक

‘…तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील’; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

पुण्यात आजपर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची वाढ; एका दिवसात वाढले एवढे रुग्ण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या