पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात-शरद पवार

बीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात, अशी टीका पवारांनी मोदींवर केली आहे. ते पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.

आज ४ वर्षांत आपल्या शेकडो सैनिकांची हत्या पाकिस्तानच्या सैन्याने केली. पण देशाला सशक्त करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारने काहीही केले नाही.  उलट आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात. हल्ल्यांना उत्तर देणं ५६ इंची छातीवाल्यांना अद्याप काही जमलेलं नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, मोदींचं समर्थन मी अजिबात केलेलं नाही आणि कधी करणारही नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-जिल्ह्याचा विकास करण्यासाठी बारामतीच्या नेत्याची गरज नाही- पंकजा मुंडे

-संभाजी भिडेंना महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा!

-शिवसेना नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल!

-मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलवले!

-सुरक्षेचा विचार न करता पवारांनी उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना दिली सावली!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा