Top News मुंबई

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

मुंबई | कैद्यांकडे नेहमी नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कैद्यांचीदेखील महाराष्ट्र पोलिसांना मदत होणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यासंबंधीत आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.

राज्यातील 9 तुरुंगात 1000 कैदी सुमारे 1 लाख मास्क तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. हे मास्क पोलीस, कैदी आणि राज्य सरकारच्या अनेक विभागातील कर्मचारी वापरणार असल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी सांगितलं आहे.

देशभरात #COVID19 विरुद्ध विविध उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्र पोलिसद्वारा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचं कौतूक केलं जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 42वर गेली आहे. राज्यात सर्वाधिक कोरानाग्रस्त पिंपरी तर त्यापाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ

बंडखोर आमदारांना भेटायला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बुधवार पेठेतील ‘तो’ व्यवसायही बंद!

सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत ते कौतुकास्पद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या