बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवताना…; प्रीतम मुंडे, नवनित राणांचा शिवसेनेवर घणाघात

नवी दिल्ली | 127 व्या घटना दुरूस्तीवरुन लोकसभेत प्रचंड चर्चा झाली. राज्यांना आरक्षणाचे अधिकार बहाल करणारं हे विधेयक लोकसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्यात आलं या विधेयकाला सर्वच राजकिय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकावर बोलत असताना 50 टक्क्यांची असलेली मर्यादा शिथील केली नसल्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षण विषय एवढे दिवस रखडणे हे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या भाषणाला उत्तर देताना भाजपच्या बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी शिवसेनेला चांगलंच फटकारलं आहे. ‘जे चांगलं केलं ते ठाकरे सरकारने व वाईट झालं ते मोदी सरकारने ही सेनेची वाईट वृत्ती आहे’, असं त्या म्हणाल्या आहेत.

प्रत्येक राज्य व तेथील सामाजिक न्यायाच्या विकेंद्रीकरणासाठी केंद्र सरकारने 127 वे घटनादुरुस्ती विधेयक मांडले. यावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनित राणा यांनी, सरकारने सोन्याचं ताट समोर ठेवलंय. पण त्यात ना लोणचं आहे, ना जेवण, असं शिवसेनेचे नेते म्हणाले. पण 32 वर्षे ज्या पक्षाबरोबर तुम्ही सोन्याच्या ताटात जेवलात, लोणचंही खाल्लं तेव्हा सर्व तुम्हाला मिळत होतं. आता हे सोन्याचं ताट पाहून शिवसेना पुन्हा भाजपसोबत येईल आणि सत्ता स्थापन करेल, अशी अपेक्षा आहे, अशी जहरी टीका केली.

प्रीतम मुंडे व नववित राणा यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. ओबीसींचं आपल्या हक्काचं आरक्षण पण आम्हाला या ठाकरे सरकारमुळेच गमवावं लागल्याचं त्या यावेळी म्हणाल्या तर शिवसेनेच्या पोटात एक अन् ओठात एक असतं, अशी टीका खासदार नवनित राणा यांनी यावेळी केली.

थोडक्यात बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय; राजीव गांधी यांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

“लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार की अजूनही घरुनच काम करणार?”

“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More