बीड महाराष्ट्र

बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?- प्रीतम मुंडे

बीड | राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?, असा सवाल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केलाय.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात आज बीडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रीतम मुंडे बोलत होत्या.

अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे, त्यांच्या मदतीसाठीदेखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत. एवढंच नाही तर कोरोना महामारीशी लढण्यासाठीदेखील सरकारकडे निधी नाही. केंद्राने दिलेल्या निधीवरच लोकांवर उपचार केले जात आहेत, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“…म्हणून डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल”

“काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्यांचे, जे कधी नाही झालं ते सगळं होत आहे”

भारतीय रेल्वेत ‘इतक्या’ लाख रिक्त पदांसाठी होणार भरती; परिक्षेची तारीख जाहीर

काँग्रेस नेत्या खुशबू दिल्लीसाठी रवाना, भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या