नवी दिल्ली | महाराष्ट्र सध्या दुष्काळाला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीतून चालला आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांनी लोकसभेत केली आहे.
संसदेत तारांकित प्रश्नावर खासदार प्रितम मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी लोकसभेत शेतकऱ्यांच्या व्यथेचा पाढा वाचला.
मराठवाड्यात आणि प्रामुख्याने बीडमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. पावसाअभावी तो शेतकरी दुष्काळाने होरपळून निघालाय. त्याला मदतीची गरज आहे, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, खासदार प्रितम मुंडे यांच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युवा नेते रोहन देशमुख यांचं स्तुत्य पाऊल; गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
-“आज माझा काकासाहेब असता तर त्यानी लय उड्या मारल्या असत्या”
-“मूका मोर्चा म्हणणारे मराठा आरक्षणाच्या जल्लोषात सामिल कसे काय?”
-अमित शहांनी लोकसभेत मांडले ‘हे’ दाेन महत्वपूर्ण प्रस्ताव!
-मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना 10 लाख अन् नोकरी कधी?? चंद्रकांत पाटील म्हणतात…
Comments are closed.