“येणारा काळ परिश्रमाचा पण त्यानंतर पंकजाताई मुख्यमंत्री होतील”

बीड | पंकजाताई मुख्यमंत्री होतील हे स्वप्न आपण सर्वांनी पाहिलंय, ते येणाऱ्या काळात लवकरच पूर्ण होईल, असं भाकीत खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय. त्या बीडमध्ये बोलत होत्या. 

येणारा काळ हा नक्कीच कष्टाचा, परिश्रमाचा असणार आहे. भविष्य संघर्षाचं आहे, त्यासाठी रस्ता खडतर आहे पण जिद्द महत्वाची आहे, असं त्या म्हणाल्या. 

बीड जिल्हासाठी येणारा काळ हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, कारण पंकजाताई मुख्यमंत्री होतील, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडायला आले नाही किंवा शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आले नाही. मात्र गर्दी वाढली आहे भाजपाची ताकद वाढत आहे, असंही त्या म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या-

धुळ्यात पहिला कल भाजपच्या बाजूने, पाहा किती जागांवर घेतली आघाडी…

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर