Top News बीड महाराष्ट्र

‘सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही’; सुप्रिया सुळेंच्या टीकेला प्रीतम मुंडेंचं प्रत्युत्तर

बीड | सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरलं असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.

कृषी कायद्याचं महत्तव पटवून देण्यासाठी राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रीतम मुंडे बोलत होत्या.

दरम्यान, प्रीतम मुंडेंच्या या टोल्यावर सुप्रिया सुळे काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्तारांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी आम्ही त्यांना…”

कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू होतोय; मनसेची राज्य सरकारवर टीका

“शेलारांना भाजपमध्ये सध्या काय किंमत आहे हा संशोधनाचा विषय”

“शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट फक्त 21 हजार 900 कोटी, तर मोदींच्या काळात…”

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या