जानकरसाहेब, आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही- प्रीतम मुंडे

बीड | जानकरसाहेब आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. त्या बीडमधील दसरा मेळाव्यात बोलत होत्या. 

प्रीतम यांनी भाषणाला सुरुवात केल्यावर एक विनोदी किस्सा घडला. प्रीतम भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांची नावं घेत होत्या. तेव्हा आई, सासू यांची नावं घेतली. त्यानंतर त्यांच्या पतीचे नाव घेताच उपस्थित समर्थकांनी एकच आवाज केला. 

त्यावर मला वाटलं फक्त मोठ्या भावोजींचाच फॅन फॉलोईंग आहे. जानकरसाहेब, आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही, असं प्रीतम म्हटल्या. त्यावर सर्वत्र एकच हशा पिकला. 

दरम्यान, प्रीतम यांनी त्यांचे पती गौरव खाडे यांना उभं राहून हात करण्याची विनंती केली. त्यावर महादेव जानकरांनी खाडेंना चक्क उचलून घेतलं होतं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या