मुंबई | नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसला 27 च्या आसपास जागा मिळतील, अशी अपेक्षा होती. ते होताना दिसत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
आमची अपेक्षा मागील जागांपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आशा होती. काँग्रेस हा राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. भाजपला रोखण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र त्यात यश येताना दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधींची प्रकृती चांगली नसल्याने आक्रमकपणे प्रचार करु शकत नाही. राहुल गांधी यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती सभा घ्यायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जातो, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीए सध्या 128 जागांवर आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मंगळावर जाणारे सॅटेलाइट नियंत्रित होऊ शकतात तर ईव्हीएम मशीन का हॅक होऊ शकत नाही?”
“एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकतं”
“राहुल गांधी यांनी ज्यांच्यासोबत हात मिळवले ते डुबले”
“अर्णब भारतीय प्रसारमाध्यमांचा मंडेला होईल, महात्मा गांधींप्रमाणेच अर्णबला त्रास दिला जातोय”
“लालू यादव आणि काँग्रेसचं गुंडाराज बिहारच्या जनतेने नाकारलंय”