पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीचं आमंत्रण, मोठी जबाबदारी मिळणार?

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीचं आवतण आल्याची माहिती आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना दिल्लीत सक्रीय केलं जाण्याची शक्यता आहे. 

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी काँग्रेस रणनीती आखत आहे. त्यासाठी अभ्यासू नेत्याची एक फळी तयार करण्यात येणार आहे. या फळीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना अग्रभागी ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय.

उच्चविद्याविभूषित आणि अभ्यासू असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीचा 19 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी विविध मंत्रालयं सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचंही कळतंय.