बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही”

सातारा | आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमध्ये करण्याच्या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आयएफएससी गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्यावेळी हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र महाराष्ट्रात व्हावं म्हणून काहीही प्रयत्न झाले नाही. फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

2004 मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेत आलं, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी पहिला निर्णय मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करण्याचा घेतला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगतिलं आहे.

दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्याबरोबर मोदी सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला आणि मुंबई ऐवजी अहमदाबादला हे केंद्र करण्याचं निश्चित केलं. 1 मार्च 2015 ला अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये हा निर्णय जाहीर केला. त्यावेळी महाराष्ट्रात फडणवीसांचे सरकार होतं. त्यांनी याविषयी आवाज उठवला का? मात्र, तसं काहीही झालं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच; देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

आम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

“काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत”

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More