बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच घणाघात केला आहे. याशिवाय पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी ट्वीटमधून केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटमध्ये काळे कृषी कायदे मागे घ्यावे लागणं हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय आहे, असं सांगत त्यांनी ट्विटमध्ये आंदोलनात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूबद्दल संतापदेखील व्यक्त केला आहे. त्यांनी यावेळी 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. याला जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. मोदींनी अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल माफी मागावी, असं त्यांनी ट्विटमधून म्हटलं आहे. एकंदरीतच सकाळी मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे देशभरातून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी सकाळीच फेसबुकवरून लाईव्ह येऊन तीन्ही कृषी कायदे मागे घेणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर देशभरातून या निर्णयावर चांगल्या वाईट प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. काहींनी यात शेतकऱ्यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रीया दिली आहे. तर काहींनी हा निर्णय योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; ‘या’ दिग्दर्शकाला करतेय डेट

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

“मी पुन्हा येत आहे, चला काहीतरी तूफानी करूयात”

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More