Top News

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस!

सातारा | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहेत. दिवाळीच्या एक दिवस अगोदर ही नोटीस आल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे वितरण द्या. त्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. येत्या 21 दिवसात याचा खुलासा करावा, असं आयकर विभागाने यात नोटीसमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता मला ही नोटीस आली आहे. त्याचे मी रितसर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

सत्तेचा वापर कसा करायचा, तो कोणासाठी करायचा, हे भाजपला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला चांगलेच जमते. केंद्रातील भाजप सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना नोटीस पाठवत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती आहे- विजय वडेट्टीवार

“साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा”

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा, अन्यथा… राजू शेट्टी

कंगणा हाजीर हो! कंगणासह बहिणीला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा बजावला समन्स

“मुंबईकर हो, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचे हे पहा मेट्रो कारनामे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या