Top News

‘मोदीजी आता अधिकच्या नोटा छापा’; पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला

मुंबई | लॉकडाऊननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारला अधिकच्या नोटा छापाव्या लागतील, असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. युवक काँग्रेसच्या वेब सेमिनारमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थव्यवस्थेबाबत भाष्य केलं.

आर्थिक गाडा हाकण्यासाठी मिळेल तेवढं कर्ज घ्यावे लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनाही सल्ला दिला. मिळेल तेवढं कर्ज काढा, तसंच केंद्राकडून मदत मिळवा, अशा सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना केल्या आहेत.

केंद्र सरकारकडून मिळेल, तेवढं कर्ज काढावं लागेल आणि शेवटी केंद्राला नोटा छापाव्या लागतील. या परिस्थितीत मला अजून यावाचून दुसरा काहीही पर्याय दिसत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

दरम्यान, मला अजूनही केंद्र सरकारने जे पॅकेज किंवा जी प्रोत्साहानात्मक मदत जाहीर केली आहे, ती अजूनही तुटपुंजी वाटते, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट; अभिव्यक्तीची गळपेची होतीये म्हणत सरकारवर सडकून टीका

कोरोना इतक्या लवकर जाणार नाही, आम्हाला लहान मुलांची काळजी- जागतिक आरोग्य संघटना

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज रहा- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या