महाराष्ट्र सांगली

पृथ्वीराज चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केल्या ‘या’ महत्त्वाच्या मागण्या

सांगली | काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही अत्यंत महत्त्वाच्या मागण्या या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या महत्त्वाच्या मागण्या-

१. महाराष्ट्रात काही हातावर पोट असणारे घटक आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशांना सरकारतर्फे काही मदत व्हावी

२. कोरोना चाचणीचा खर्च कोण करणार याचे स्पष्टीकरण द्यावे. सर्व खर्च महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट केला जावा आणि तसे सुस्पष्ट आदेश द्यावेत.

३. खासगी डॉक्टर व खासगी दवाखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पीपीई किट द्यावेत.

४. केंद्राने रॅपिड टेस्टिंग बंद केली आहे, त्यावर कार्यवाही व्हावी.

५. धान्य घेताना लाभार्थ्यांचा पॉश मशिनमध्ये ठसा उमटला नाही तर धान्य दिलं जात नाही, ठसा उमटला नाही तरी धान्य दिलं पाहिजे.

६. बाहेरच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील मजुरांकडे शिधापत्रिका नसल्यास त्यांना अंत्योदय योजनेप्रमाणे तीन महिने धान्य दिले जावे. त्यांना आधार कार्डवर बांधकाम मजुरांप्रमाणे २ हजार रुपये भत्ता दिला जावा.

७. मागील कर्जाचे हप्ते न दिलेल्या शेतकऱ्यांनाही नवीन कर्ज द्यावे, तसेच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते-बी बियाणे यांचा पुरवठा करावा. कापूस खरेदी यंत्रणा मजबूत करावी व शेतकऱ्यांना हमीभावाची खात्री द्यावी.

८. आरबीआयने हप्ते व व्या ज भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, ती सहकारी सोसायट्या व विकास सेवा सोसायट्यांनाही लागू करावी.

६. राष्ट्रीयकृत बँकांची व सहकारी बँकांची कर्जे तीन महिन्यांवरुन सहा महिन्यांपर्यंत मुदत वाढवावी तसेच सहा महिन्यांचे व्याज केंद्र सरकारने भरावे, अशी विनंती राज्य सरकारने करावी.

७. वर्तमानपत्रांचे वितरण सुरु ठेवावे. केबल वाहिन्यांना विनंती करुन पुढील तीन महिन्यांसाठी केबल वाहिन्यांचे दर कमी करण्यात यावेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या