सातारा | भारत-चीन मुद्दा हा देशहिताशी संबंधित आहे, हे काही आमच्या घरचं काम नाही. त्यामुळे काँग्रेस या प्रश्नावर जनतेच्या भावना मांडणारच, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलंय.
आम्ही या प्रश्नी राजकारण करत नसून सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही पार पाडत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यामध्ये बोलत होते.
पवारांनी राहुल गांधी यांनी चीनप्रश्नी केलेल्या विविध वक्तव्यांचा समाचार घेत इतिहासाचा अभ्यास करत तसेच माहिती घेत टीका करण्याचं सांगत त्यांना सुनावलं होतं. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पवारांवर टीका केली आहे.
लोकभावना व्यक्त करणं कुणाला चुकीचं वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे, असं सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या वक्त्तव्यावर आक्षेप घेतलाय.
ट्रेंडिंग बातम्या-
पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा
महत्वाच्या बातम्या-
“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”
इंधन दरवाढ ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल