बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

सातारा |    ढासळलेली अर्थव्यवस्था सुरू करण्याचा एक पर्याय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यात दारूच्या दुकानाबाहेर दोन दिवसांत जी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तसंच नंतर तेथील प्रशासनाने दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिले. जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारूविक्री होत असेल तर काहीच हरकत नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

गेल्या दोन दिवसांत दारूची विक्री करताना जरासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दारूच्या दुकानावर होणारी गर्दी पाहिली की आपसूक लक्षात येतं की सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत. मात्र लोकांनी जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले तरच दारू विक्री सुरू ठेवावी, असं ते म्हणाले आहेत.

दारू विक्री करताना सध्या गोंधळाचं चित्र आहे. हा निर्णय घेताना जर दोन दिवसांचा अवधी दिला असता तर ऑनलाईन वगैरेची सोय करत आली असती. आणि आज जो गोंध उडाला तो गोंधळ उडाला नसता,  असंही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, दीड महिन्यातून सोमवारी आणि मंगळवारी देशभरातील दारूची दुकाने उघडली होती. इतकी मोठी प्रतिक्षा केल्यानंतर मद्यप्रेमींचा आनंदाला उधाण आलं होतं. त्यांनी ठिकठिकाणच्या दारू दुकानाबाहेर दारू घेण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या.

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

आमचा चौथा उमेदवार आरामात निवडून येईल; फडणवीसांनी महाविकास आघाडीला ललकारलं

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाहा पुण्यात किती रूग्ण सापडले? तर किती रूग्णांना ठणठणीत होऊन घरी सोडलं…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More