शिवसेनेकडून काँग्रेसला एकत्र येण्याची ऑफर?

मुंबई | शिवसेनेला काँग्रेससोबत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधावा, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसला शिवसेनेची ऑफर आल्याची चर्चा सुरु झालीय. 

औरंगाबादमध्ये काँग्रेसकडून व्हिजन 2019 शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, काँग्रेस-शिवसेना गणित काही नवं नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको.