बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील जनतेच्या प्रति आपली जबाबदारी नाही का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. या वादळाने महाराष्ट्रातील किनापपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या वादळात अनेक गावं उध्वस्त झाली तर काहींची घरसुद्धा गेलीत. त्यासोबतच मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीलाही याचा जबर फटका बसला. नुकसानीच्या भरपाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1000 कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली. यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

सायक्लॉन तौक्तेमुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. पण प्रधानमंत्री मोदींनी फक्त गुजरातचा दौरा केला आणि त्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील पीडित जनतेच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का?, असं सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत?, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. याआधी शिवसेना नेेते आणि खासदार संजय राऊत यांनीही यावर आपलं बोलताना मोदींना टोला हाणला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे संपूर्ण देशात लक्ष असतं. गुजरातला 1000 कोटी दिले तर ते महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी 1500 कोटींची मदत देतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र आणि गोव्याला केंद्र सरकारने अनुक्रमे 1500 आणि 500 कोटींची मदत द्यावी, अशी मागणीही संजय राऊतांनी केली.

 

थोडक्यात बातम्या- 

महत्त्वाची बातमी! कोरोनाचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

भारताच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचं निधन

पुणे | भाच्याने मामाला घातला गंडा, रक्कम ऐकून हैराण व्हाल

….म्हणून डॉन अरुण गवळीची दगडी चाळ होणार जमीनदोस्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More