बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पृथ्वीराज चव्हाण यांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले…

मुंबई | काँग्रेस (Congress) मधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मागच्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु असल्याची चर्चा होती. परंतु आज गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसच्या सगळ्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे

सर्वात जुना व्यक्ती पक्ष सोडून गेला हे दुर्दैवी आहे. पक्षाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. काँग्रेसचा सेक्युलर चेहरा सोडून गेला आहे, असं चव्हाण म्हणालेत.

सध्या हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरु असताना सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही अपेक्षा शिल्लक नाहीत. काँग्रेस मजबूत असणे गरजेचे आहे. काँग्रेसला प्रभावी विरोधी म्हणुन पुढे येणे गरजेचं आहे, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More