बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेवून भाजपला मतदान केल्याचं धक्कादायक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ‘लोकमत’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. आझाद यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीका करत घरचा आहेर दाखवला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More