बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या पण…”

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. यामुळे काही पंकजा मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले होते. यानंतर आज  पंकजा मुंडेंनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधला. अशातच आता या मुद्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत तोंडसुख घेतलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या या अधिकाराचा आपण सन्मान केला पाहिजे. मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या, परंतु त्या पुर्ण झाल्या नाहीत. मात्र, ही नाराजी काही दिवसच राहते, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी आज नाराज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर स्वपक्षावर देखील अप्रत्यक्षपणे वार केले आहेत. माझा प्रवास मागेही खडतर होता आणि पुढेही खडतर दिसत आहे. मी निवडणुकीत पडले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्न देखील संपले असते. मी संपलेली नाही मी तुमच्या जिवावर आहे, असं म्हणत पंकजा मुंडेेनी स्वपक्षावरच अप्रत्यक्षपणे घणाघात केला आहे.

तसेच पंकजा मुंडे आपल्या भाषणात, माझा नेता नरेंद्र मोदी, माझा नेता अमित शहा, माझा नेता जे.पी. नड्डा आहेत, असं म्हणाल्या. मात्र, त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचा उल्लेख केला नाही. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘मुस्लिम मोहल्ल्यात शाखा उघडणार’; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

….म्हणून करीना कपूरचं नवं पुस्तक प्रकाशित होताच वादाच्या भोवऱ्यात

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते’; पंकजा मुंडेंचा स्वपक्षावर अप्रत्यक्ष घणाघात

“तुमचं दुःख माझ्या ओटीत टाका आणि माझ्या चेहऱ्यावरील हसू तुम्ही घरी घेऊन जा”

‘दिलीप कुमार उत्कृष्ठ अभिनेते होते पण…’, नसीरुद्दीन शाह यांंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More