बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे सरकारला ‘त्या’ निर्णयावरून घरचा आहेर; म्हणाले…

पुणे | राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांवरून राज्य सरकारने प्रभाग रचनांमध्ये बदल केले आहेत. परंतु, या बदलांवरून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं पहायला मिळतय. राज्य सरकारने 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे, मात्र, अजुनही काँग्रेस दोन सदस्यीय प्रभाग रचनेवर अडून आहे.

राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. 2 किंवा 4 सदस्यांचा प्रभाग असावा असं माझ मतं आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत दोन सदस्याचा प्रभाग असावा, असा ठराव झालेला आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

प्रभाग किती सदस्यांचा असावा याबाबत अजुनही संभ्रम पहायला मिळतो. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी तडजोड करत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. यावर महाविकास आघाडी सरकारने दोन सदस्यीय प्रभाग करण्याचा विचार करावा, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यात इतर महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. परंतु, काँग्रसकडून या रचनेस विरोध दर्शवण्यात येत आहे.

दरम्यान, आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी सर्व महानगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग असावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा मंजूर करण्यात आलेला ठराव राज्यसरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“‘त्यांच्यामुळे’ मी राजकारणात स्थिर झालो, माझा आणि राजकारणाचा दूरदूरचा संबंध नव्हता”

गांधी जयंतीदिवशी सोशल मीडियावर धार्मिक कट्टरतावाद्यांकडून नथूराम गोडसे जिंदाबादचा नारा!

“मंत्री या नात्याने माझ्या विचारांना चालना देण्याचं काम करणं तुमचं कर्तव्य आहे”

“मेहनत, खुप घाम गाळून जनतेचा विश्वास मिळवलाय, कोणत्याही पीआर एजन्सीमुळे नाही”

“ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More