पुणे महाराष्ट्र

खासगी लॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह तर सरकारी अहवाल निगेटिव्ह; पुण्यातील धक्कादायक प्रकार

शिरूर (पुणे) |   खासगी लॅबमध्ये कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह असा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाहायला मिळाला आहे. यानिमित्ताने खाजगी आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

38 वर्षीय एक व्यक्तीवर शिरूरमधल्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ताप, थंडी खोकला अश्या प्रकारचा त्रास त्यांना होत होता. कोरोनाची लक्षणं असल्याने संंबंधित डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगितली. त्यांनीही लगोलग खाजगी लॅबमध्ये टेस्ट करून घेतली. त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र पत्नीली कोणतीच लक्षणं नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुचचुकली आणि त्यांनी सरकारी लॅबमध्ये टेस्ट करण्याचा निर्णय घेतला.

खाजगी लॅबमध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्यांनी खराडी इथल्या महापालिकेच्या सरकारी लॅबमध्ये टेस्ट केली. टेस्टनंतर अवघ्या 2 तासांत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं. रिपोर्ट आल्याबरोबर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र दरम्यानच्या काळात त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

इकडे संबंधित रूग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर झाला होता. परिसराच्या आजूबाजूला बांबू पत्रे लावून परिसर सील करण्याचं काम सुरू होतं. सरकारी लॅबचा रिपोर्ट आरोग्य प्रशासनाला दाखवल्यानंतर मग हे काम थांबवण्यात आलं. मात्र दरम्यानच्या या दोन तीन दिवसांत आम्हाला नाहक त्रासाला सामोरं जावं लागल्याची खंत रूग्णाने बोलून दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या-

धारावीचा धोका टळला अन् सुरू झालाय मुंबईतल्या या भागात कोरोनाचा हैदोस!

केंद्र शासनाकडून मका खरेदीस या तारखेपर्यंत मुदतवाढ, मंत्री भुजबळांची माहिती

प्लाझ्मा थेरपीबाबत जनतेने सावध राहावं, गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन

राज्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन….. ‘या’ भागामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता!

आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी माझा आनंद द्विगुणित झाला, अजितदादांनी मानले आभार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या