Top News देश राजकारण

महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस नेत्याचा सचिन पायलट यांना पाठिंबा

जयपुर | राजस्थानमध्ये सध्या बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. सचिन पायलट यांना पक्षाने उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलंय. यावर पायलट यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळालीये. राजस्थानमधील राजकीय नाट्यावर काँग्रेस नेत्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षातून आणखी एक मित्र निघून गेला, सचिन आणि ज्योतिरादित्य हे दोघंही चांगले मित्र व पक्षातील सहकारी होते. दुर्देवाने पक्षाने 2 चांगले निष्ठावान युवक नेते गमावलेत. माणसाने महत्त्वाकांक्षी असणं यात गैर नाही. पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी मोठं कष्ट घेऊन काम केलंय, असं ट्विट प्रिया दत्त यानी केलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टीममधील यंग ब्रिगेड म्हणून ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जात होतं. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सचिन पायलट यांनीही पक्षात बंड केलं. याबाबत काँग्रेसच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी ट्विटर वरुन आपलं मत मांडलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रतिभेला स्थान नसल्याची टीका करत पायलट यांचं समर्थन केलंय. पायलट यांनी काँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढल्यावरून जितिन प्रसाद यांनीही ट्विट केलं आहे. सचिन पक्षातील सहकारीच नाहीत तर माझे मित्रही आहेत. पक्षासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केलंय, हे कोणीही नाकारू शकत नाही. अजूनही परिस्थिती सुधरू शकते अशी आशा आहे. मात्र, स्थिती आता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे, असं ते म्हणालेत.

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या