बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच; आता ‘या’ पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा!

पुणे | महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे. आता युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रिया नारायण पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानं युवक काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

प्रिया पवार यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना पाठवलं आहे, तसेच त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुनही हे पत्र सार्वजनिक केलं आहे.

शालेय जीवनापासूनच घरातील वातावरणामुळे तसेच सामाजिक सहभागामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल माझ्या मनात ओढ निर्माण झाली होती. काँग्रेसने दिलेली जबाबदारी मी तळमळीने पार पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोग्य विषय कारणांमुळे मी राजीनामा देत आहे, असं प्रिया पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

प्रिया पवार या पुण्याजवळच्या खेडचे माजी आमदार नारायण पवार यांच्या कन्या आहेत, मात्र त्यांना संघटनेतील गटबाजीचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. युवक काँग्रेसमध्ये सध्या धुसफूस सुरु असल्याचं चित्र असून आगामी काळात युवक काँग्रेसमध्ये आणखी काही राजीनामे देखील पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यपाल चांगली व्यक्ती आहे, त्या नावांना विरोध करणार नाहीत”

दहावी-बारावीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरु करण्याचा विचार; वर्षा गायकवाड

स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More