प्रियाचा दुसरा व्हिडिओ व्हायरल, कातील अदांनी सोशल मीडिया घायाळ

मुंबई | नवोदित मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने साऱ्या देशाला वेड लावलंय. अशातच तिच्या अदाकारीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. 

ओरु अदार लव्ह या तिच्या आगामी सिनेमाचा हा टीझर आहे. ज्यामध्ये प्रिया बोटांची बंदूक करुन आपल्या आपल्या वर्गातील मुलावर निशाणा साधताना दिसत आहे. तोही तिच्या निशाण्यावर घायाळ झालेला पहायला मिळतोय. 

पहिल्या व्हिडिओप्रमाणेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रियाचे एक्स्प्रेशन जबरदस्त आहेत. त्यामुळे कालच रिलीज झालेला हा ट्विटर यूट्यूवर पहिल्या नंबरवर ट्रेंड होताना दिसतोय.