अबब!!! इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी मिळाले 8 लाख!

मुंबई | ‘एक्‍स्प्रेशन क्‍वीन’ म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाशला तिच्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 8 लाख रुपये मोजले जातात, अशी माहिती समोर आली आहे.

तिच्या ‘ओरू अदार लव’ या आगामी चित्रपटाची क्लिप व्हायरल झाली होती. या व्‍हिडिओमुळे रातोरात स्‍टार झालेल्या प्रियाचे सोशल मीडिया फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. इंस्टाग्रामवर तर आता तिचे 50 लाखाहून अधिक फाॅलोअर्स आहेत.

प्रियाने इंस्टाग्रामवर एका ब्रॅंडचे प्रमोशन केले आणि त्यासाठी तिला चक्क 8 लाख रुपये मिळाले. बऱ्याच ऑनलाईन जाहिरातींचीही प्रियाला ऑफर मिळत असल्‍याचं समजतंय.