काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्सींचं निधन; 9 वर्षे होते कोमात!

नवी दिल्ली | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्सी यांचं निधन झालंय. ते गेल्या 9 वर्षांपासून कोमात होते. 

2008 साली हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोमात गेले होते. तेव्हापासून ते कोणालाही ओळत नव्हते. 

आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक मोठी पदं सांभाळलेले प्रियरंजन दासमुन्सी 1971 साली दक्षिण कोलकाता लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 1985 साली त्यांना राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं होतं. 

दरम्यान, 2004 सालच्या यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात ते सूचना आणि प्रसारण मंत्री होते. यावेळी त्यांनी AXN आणि फॅशन टीव्हीवर बंदी घातली होती.