महाराष्ट्र मुंबई

“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला”

मुंबई | विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी निर्णय बदलून शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

‘पॉवर ट्रेडिंग’च्या लेखिका प्रियम गांधी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचीत केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री करण्याचं शरद पवार यांचं स्वप्न आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार टिकलं तर आपले हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली. त्यामुळेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला, असं लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपला पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी राष्ट्रवादीतील एका माजी केंद्रीय नेत्याच्या माध्यमातून भाजपशी बोलणी सुरु होती, असंही प्रियम गांधी यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस

“संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल”

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील

“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या