प्रियांका चोप्रा आता लहान मुलांना देणार खास गिफ्ट!

मुंबई | ‘व्हेंटिलेटर’नंतर प्रियांका चोप्रा आता लवकरच बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तिचा हा चित्रपट भटक्या कुत्र्यांवर आधारित असणार आहे. खास लहान मुलांची आवड लक्षात घेऊन तिने या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे.

या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा अभिनेत्रीच्या शोधात आहे. मध्यंतरी आलिया भट या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होती मात्र ही केवळ अफवा आहे, असं आलियाने सांगितलं.

“जर संधी मिळाली तर मला प्रियांकाच्या चित्रपटात काम करायला आवडेल”, असंही आलिया म्हणाली. भटक्या कुत्र्यांवरच्या या चित्रपटाची कथा नक्की काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.