लग्नात मुलापेक्षा मुलगी वयाने मोठी असली तर कुठं बिघडलं?, प्रियांकाचा सवाल

मुंबई | अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्यातील वयाचं अंतर कायमचं चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे प्रियांका कायम ट्रोल होत राहिली. आजपर्यंत प्रियांकाने या चर्चांना उत्तर दिलं नव्हतं. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वयाच्या अंतरावर ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

‘पुरुष साथीदार वयाने मोठा असेल तर ते लोकांना चालतं. पण स्त्री वयाने मोठी असेल तर प्रश्न उपस्थित केले जातात. यावरच प्रियांकाने बोट ठेवलंय.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांका-निक लग्न बंधनात अडकले. भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच चर्चेत असते.

दरम्यान, प्रियांकानी आपल्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान असलेल्या निक जोनास याच्याशी लग्न केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-अमित शहा कुणाच्या बंगल्यात राहणार माहितीये का??

…तर मग प्रकाश आंबेडकरांनी माझ्या नेतृत्वात काम करावं- रामदास आठवले

-भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; अकबर महिलांच्या वेशात मीनाबाजारात जायचा आणि…

-राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक दावा

-भाजपला धक्का देण्यासाठी ममतांना मिळाला ‘हा’ हुकमी एक्का!