Priyanka Chopra | बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने मुंबईतील चार आलिशान अपार्टमेंट्स विकले आहेत. हे अपार्टमेंट्स मुंबईतील ओबेरॉय स्काय गार्डन (Oberoi Sky Garden) येथे होते आणि त्यांची एकूण विक्री किंमत 16.17 कोटी रुपये इतकी आहे.
फ्लॅट्सच्या विक्रीतून मिळाले कोट्यवधी रुपये
- पहिला फ्लॅट: 3.45 कोटी
- दुसरा फ्लॅट: 2.85 कोटी
- तिसरा फ्लॅट: 3.52 कोटी
- चौथा फ्लॅट: 6.35 कोटी
चारपैकी तीन फ्लॅट्स 18व्या मजल्यावर आणि एक फ्लॅट 19व्या मजल्यावर होता.
लग्नानंतर प्रियंका यूएसमध्ये स्थायिक
2018 मध्ये गायक निक जोनास (Nick Jonas) सोबत विवाह केल्यानंतर प्रियांका चोप्रा यूएसमध्ये स्थायिक झाली. ती आता आपल्या पती आणि मुलीसोबत राहते.
अभिनेत्रीच्या फिल्मी करियरबद्दल बोलायचे झाल्यास ती, लवकरच एस.एस. राजामौली (S.S. Rajamouli) यांच्या आगामी चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) मुख्य भूमिकेत आहे.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) शेवटची 2019 मध्ये ‘The Sky Is Pink’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ महत्त्वाच्या भूमिकेत होते.
Title : Priyanka Chopra Sells 4 Luxury Flats in Mumbai