बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने प्रचंड यश मिळवलं आहे. अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकरुन तिने लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे. मात्र आता प्रियंका चोप्राची बहिण अभिनेत्री मीरा चोप्राने प्रियंकावर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. मीरा चोप्रा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

मादक अदा आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं स्वत:चा असा एक वेगळा फॅन फॉलोइंग निर्माण केला आहे. मीरा सोशल मीडियावर देखील प्रचंड अॅक्टीव्ह असून तिचे सगळे अपडेट्स ती तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंट शेअर करत असते. मीराने दाक्षिणात्य सनेसृष्टीत आपली एक ओळख बनवली मात्र बॉलिवूडमध्ये तिला तिची कमाल दाखवता आली नाही. अन् या अपयशासाठी मीराने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला जबाबदार धरलं आहे.

मीरा ही प्रियांकाच्या सख्ख्या काकाची मुलगी आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. मीरानं 2014 साली गॅग्स ऑफ घोस्ट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. प्रियांका तिची बहिण असल्यामुळं कायम तिची तुलना तिच्यासोबत केली गेली आणि लोकांना वाटतं मी प्रियांकाची बहिण असल्यामुळं मला काम मिळतं मात्र हे साफ खोट असल्याचं मीराने सांगितलं आहे.

दरम्यान, प्रियंकाच्या प्रसिद्धीचा मीराला कायम तोटाच झाला असून प्रियांचा द्वेष करणारे मला काम देत नाहीत कारण मी तिची बहिण आहे आणि तिचे चाहते कायम तुलना करतात, असं देखील ती म्हटली आहे.

थोडक्यात बातम्या-

समय समय की बात हैं, ज्यांना नागपुरातून बाहेर जा सांगितलं, त्यांना परत येण्यासाठी आर्जव!

मी माझं आयुष्य जगलो म्हणत तरुणाला स्वत:चा बेड देणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाचं निधन

बायकोच्या प्रियकराबद्दल कळल्यानंतर त्याने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More