बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डीपनेकवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाच्या आईचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

मुंबई |  ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेला गाऊन चांगलाच चर्चेत आहे. या डीपनेक गाऊनवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. यावरून प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी आपल्या मुलीची बाजू घेत ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिलं आहे.

ते तिचं शरीर आहे. तिला सुंदर शरीराची देणगी मिळाली आहे. त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते. इतकचं मी सांगू शकते,असं मत मधू चोप्रा यांनी व्यक्त केलं आहे. प्रियांकाला ट्रोल करणारे लोकं हे केवळ कॉप्युटरच्या स्क्रीनमागे बसणारी लोकं आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंदाचा तोटा आहे असंच मला वाटतं, असंही त्या म्हणाल्या आहेत.

एखाद्याबद्दल वाईट बोलल्याने लोकं आपल्याकडे लक्ष देतील असं या ट्रोलर्संना वाटतं. अशा ट्रोलर्सला मी जास्त किंमत देत नाही, असा टोलाही मधू यांनी लगावला आहे.

प्रियांका तिच्या मनानुसार आयुष्य जगते. जोपर्यंत ती इतर कोणाला त्रास देत नाही किंवा इजा पोहचवत नाही तोपर्यंत तीने हवं तसं जगण्यात मला काही चुकीचं वाटत नाही, असं मत मधू चोप्रा यांनी व्यक्त केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारवर स्तुतीसुमने

“कुडाची झोपडी अन् आदिवासी मावशीचा स्वयंपाक, काय म्हणावं या नेत्याला”

महत्वाच्या बातम्या-

सर्वसामान्यांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमायला लावणारा अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!

‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More