बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत यांनी काही दिवसांपुर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी महिलांवर केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींचा हाफ चड्डीवरचा फोटो शेअर करत, रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि केद्रिंय मंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या हाफ चड्डीतला फोटो शेअर केला आहेत. ‘अरे देवा… यांचे तर गुडघे दिसत आहे की…’ असं कॅप्शन त्यांनी यावर दिलं आहे. या ट्विटला भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आजकाल महिला फाटक्या जिन्स घालून फिरतात. हे सगळं बरोबर आहे का? हे संस्कार आहेत का? लहान मुलांना लागणारे संस्कार हे मोठ्यांतून येत असतात, असं वक्तव्य रावत यांनी केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियामधून त्याच्यावर प्रचंड टीका केेली गेली.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांसोबत अनेक जणांनी रावत यांच्या टीकेचा निषेध नोंदवला. रावत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला भाजपवर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

“शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More