Loading...

कलम 370 हटवण्यावर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया…

सोनभद्र | कलम 370 च्या निर्णयावर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवणं हे देशाच्या संविधानविरोधी आहे. कलम 370 हे लोकशाही मार्गाने हटवण्यात आलं नाही, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे.

कलम 370 हटवून सरकारने संविधानविरोधी निर्णय घेतला आहे. अशा गोष्टी करताना नियम आणि कायद्याचा अवलंब करावा लागतो, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

Loading...

प्रियांका गांधींनी आज सोनभद्रमध्ये जाऊन सामूहिक हत्याकांडातील कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, कलम 370 च्या निर्णयाला काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. तर काँग्रेसच्याच काही नेत्यांनी विधेयकाचं समर्थन केलं होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाचं अटक वॉरंट

-सांगलीत भाजप नगरसेविकेची गुंडगिरी; पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

-पुण्यातील शिक्रापूरमध्ये महिलेचा विनयभंग, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Loading...

-लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला- संभाजी भिडे

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

Loading...