नवी दिल्ली | नथुराम देशभक्त आहे आणि देशभक्तच राहणार, असं वक्तव्य भाजपच्या प्रज्ञा साध्वींनी केलं होतं. यावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
हे राम… बापूजींचा मारेकरी देशभक्त?? आपला उमेदवाराच्या मतावर हात झटकणे बरोबर नाही, असं प्रियांका गांधींनी ट्वीट करून यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी आता स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी प्रियांकांनी केली आहे.
बापू का हत्यारा देशभक्त?
हे राम!Distancing yourself from your candidate is not enough. Nationalistic luminaries of the BJP, have the guts to spell out your stand.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2019
त्यांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडली आहे. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी यावर माफी मागितली पाहिजे, असं भाजपने म्हटलं आहे.
साध्वींच्या वक्तव्यावर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-जय काली कलकत्तावाली, 56 इंच की हवा निकाली; जितेंद्र आव्हाडांची मोदींवर बोचरी टीका
-सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीसमोर गाय आल्याने अपघात; भागवत सुखरूप
-नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण नव्या वळणावर; आता तनुश्री म्हणते…
-बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे
-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार
Comments are closed.