नागपूर महाराष्ट्र

महाराष्ट्रातून प्रियांका गांधी लोकसभा लढणार?, राहुल गांधींना काँग्रेस प्रवक्त्याचं पत्र

नागपूर | काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पत्र नागपूर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना लिहलं आहे.

नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पक्ष कार्यकर्त्यांची गळचेपी होत आहे आणि गेल्या 4 वर्षांपासून त्यात कोणताही फरक पडला नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे जनसमर्थनाचा फायदा मिळवण्यासाठी प्रियांका गांधी यांनी नागपूरमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी सिंगलकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा, आमंत्रण मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडेना! चर्चांना उधाण

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी”

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?

-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या