नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
जेव्हा भाजप सरकारमधील मंत्री आणि नेते गोळ्या घालण्यासाठी उकसवतात, भडकाऊ भाषणं देतात, तेव्हा अशा घटना शक्य आहेत. पंतप्रधान मोदींनी यावर उत्तर द्यायला हवं की त्यांना कशाप्रकारची दिल्ली हवी आहे, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
दिल्लीसारख्या शहरात विद्यार्थ्यांवर गोळीबार झाल्याने प्रियांका चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते हिंसेसोबत आहेत की अहिंसेसोबत? त्यांना विकास हवा आहे की अराजकता हवी आहे? असे सवाल त्यांनी केले आहेत.
गोळीबार केलेल्या तरुणाने गोळीबारापूर्वी फेसबुक पोस्ट केली होती. त्या तरुणाचे नाव रामभक्त गोपाल असल्याचं समजत आहे. दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
जब भाजपा सरकार के मंत्री और नेता लोगों को गोली मारने के लिए उकसाएँगे, भड़काऊ भाषण देंगे तब ये सब होना मुमकिन है। प्रधानमंत्री को जवाब देना चाहिए कि वे कैसी दिल्ली बनाना चाहते हैं?
वे हिंसा के साथ खड़े हैं या अहिंसा के साथ?
वे विकास के साथ खड़े हैं या अराजकता के साथ? pic.twitter.com/jWywAqAW3G
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 30, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मशिदींना हात लावल्यास आम्ही मुस्लिमांच्या पाठीशी; आठवलेंचा मनसेला इशारा
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
फडणवीसांची घोषणा अन् ठाकरे सरकारची अंमलबजावणी; 70 हजार जागांची महाभरती
Comments are closed.